हाक, बोंब ना कल्ला, चोराने मारला बाईकवर डल्ला

पी.डब्लू.डी. क्वॉर्टरमधून हिरो होंडा कंपनीची बाईक लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: सरकारी नोकरीत असलेले फिर्यादी बालाजी भीमराव बोगुलवार (40) हे वणीतील पी.डब्लू.डी. क्वॉर्टरमध्ये राहतात. मंगळवार दिनांक ४ मार्चला रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपली गाडी लावली. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.00 वाजता त्यांना आपली गाडी जागेवर दिसली नाही.

त्यांनी बराच वेळ इतरत्र आपल्या गाडीचा शोध घेतला. परिसरातल्या लोकांना विचारपूस केली. मात्र हाती काहीच आलं नाही. आपली गाडी चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग अखेर गुरुवार दिनांक १३ मार्चला त्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फिर्यादीची हिरो होंडा ड्रीम युगा कंपनीची जुनी वापरती मोटार सायकल होती. तिचा नंबर MH29AS1257 तसेच चेचीस क्र. ME4JC58ACFTO70725 व इंजिन क्रमांक JC58ET4071361 होता. ती रातोरात चोरट्याने पळविली. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303 (2) BNS अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास- पोउपनि गुल्हाने करत आहेत.

Comments are closed.