विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रभाव सुरूच असताना आता बर्ड फ्ल्यूने पाय पसरविण्यास सुरवात केली आहे. काही राज्यात सुरू असलेल्या बर्ड फ्ल्यूच्या धास्तीने आपल्या परिसरात अनेकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिकनच्या विक्रीत 20 ते 25 टक्क्यांची घट झाली आहे. चिकन व्यावसायिकांनी चिकनचे दरही कमी केले आहे. मात्र तरी देखील बर्ड फ्ल्यूच्या दहशतीत कायम असलेली दिसत आहे.
देशातील काही भागात या बर्ड फ्ल्यू या रोगाची साथ सुरू झाली आहे. लोकांनी चिकन कडे पाठ फिरवू नये यासाठी बॉयलर व पोलट्री चिकनचे दर निम्याने कमी केले आहे. सध्या 120 रुपये किलो रुपयांनी मिळणारे बॉयलर चिकनचा दर आता 70 रुपये किलो झाले आहे. तर पोलट्री आधी 120 रुपये नग होती, आता ती 90 रुपये नग झाली आहे. गावराणी चिकनच्या दरातही घसरण झाली
काय म्हणतात चिकन होलसेलर?
वणीतील दीपक चौपाटी परिसरात होलसेल व रिटेल चिकन विक्री करणारे तौकिर अहेमद शब्बीर हुसेन यांचे नबी चिकन सेंटर नावाने चिकनचे दुकान आहे. त्यांची आम्ही भेट घेतली असता. ते म्हणाले की…
चिकनची विक्री ही 20 -25 टक्क्यांनी कमी झाली आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी जी विक्री होती त्यामध्ये 20-25 टक्क्यांनी घट आली आहे. चिकन व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. परंतु उत्पादन करणा-या पोलट्री फार्मिंग व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेक अफवांमुळे ही परिस्थिती आली आहे.
– तौकीर अमेहम शब्बीर हुसैन, चिकन होलसेल विक्रेते
चिकन खाणे योग्य आहे का?
या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी बर्ड फ्ल्यूच्या काळात चिकन खाण्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले. बर्ड फ्ल्यूचा विषाणू हा 70 डिग्री सेल्सीयसला नष्ट होतो. आपल्याकडे चिकन चांगले शिजवून किंवा बॉइल करून खाल्ले जाते. त्यामुळे त्यात बर्ड फ्ल्यूचे सर्व विषाणू नष्ट होतात. त्यामुळे चिकन खाण्याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. चिकन हा प्रोटीनचा चांगला सोर्स आहे. त्यामुळे खाण्यास काहीही धोका नाही. मात्र अर्धकच्चे चिकन खाल्यास त्याचा प्रकृतीवर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: