आदर्श प्रशासकिय महविद्यालयात महामानवांच्या जयंती

'स्वच्छता ही सेवा' हा सरकारचा उपक्रम राबविला

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्त भारत सरकारचा ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गौरकार, उपाध्यक्ष उज्ज्वला गौरकार, सचिव पुरुषोत्तम नवघरे, प्राचार्य निशांत खोब्रागडे, प्रा. महेश पुंड, प्रा. किसन किनाके, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं. महामानवांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शुभम गाणफाडे, राहुल झाडे, रुपेश आलाम, प्रणाली पत्रीवार, रंजना भांडारवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Comments are closed.