मध्यरात्री साप निघाल्याचा कॉल… उकणीच्या सर्पमित्रांचे अजगराला जीवदान

साप निघाल्यास सर्पमित्र हरीश कापसे 9373462024 यांना कॉल करण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मध्यरात्रीची वेळी. सव्वा दोन वाजताच्या सुमारास अचानक सर्पमित्र हरीश कापसे यांच्या मोबाईलवर एका अनोखळी नंबरवरून कॉल येतो. पुढील व्यक्ती तो प्रवीण पचारे असून उकणी येथून बोलत असल्याची ओळख करून देत त्यांच्या घरी मोठा अजगर निघाल्याचे तो सांगतो. हरीश कापसे यांनी तातडीने त्यांच्या टीममधील उकणी येथील सर्पमित्र सूरज नत्थूजी परशिवे यांना कॉल केला. त्यानंतर मध्यरात्रीच पटापट सुत्रे हलली व अवघ्या काही वेळातच उकणी येथील सर्पमित्रांची टीम उकणी येथे पोहोचली. गणेश चौधरी, धनराज मतिरे, स्वप्नील गोवरदीपे, अभय मोडक, प्रफुल्ल पिंपळशेडे या टीमने अवघ्या 5 मिनिटात अजगाराला सुरक्षीत पकडले. रेस्क्यू करण्यात आलेला अजगर सुमारे 10 फुटांचा होता. सकाळी टीमने अजगराला वनविभागाच्या कर्मचा-याच्या उपस्थितीत जंगलात सोडले. अजगराला जीवदान मिळाल्याने सर्पमित्रांचे कौतुक होत आहे. जीवन सृष्टी सामाजिक बहुदेशीय संस्था ही सापाच्या संरक्षणासाठी काम करते. परिसरात साप निघाल्यास त्याला न मारता सर्पमित्र हरीश कापसे यांच्या 9373462024 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.