साधेपणाने संजय देरकर यांचा वाढदिवस साजरा

आशा वर्कर्सचा सत्कार, अनेकांनी बांधले शिवबंधन

जितेंद्र कोठारी, वणी: शिवसेना नेते व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांचा कोणताही मोठा गाजावाजा न करता साधेपणात वाढदिवस साजरा कऱण्यात आला. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. संजय देरकर यांना शुभेच्छा देण्यासाठी गाव खेड्यातील कार्यकर्ते वणीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

वाढदिवसासाठी कार्यकर्ते व चाहते सकाळपासूनच देरकर यांच्या घरी पोहोचले होते. सकाळी 10 वाजता छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह केक कापला. सकाळी 11 वाजता ग्रामीण रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

24 आशासेविकांचा सत्कार
कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणा-या आशा वर्कर्स यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी वणीतील सर्व 24 वर्कर्सची उपस्थिती होती. त्यांना साडी, चोळी व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय कार्यक्रम स्थळी लसीकरण मोहिमही राबवण्यात आले. यावेळी अनेकांनी कोरोनाची लस घेतली.

अनेक तरुणांनी बांधले शिवबंधन
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व संजय देरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्स साधून शिवसेने तर्फे ‘घर तिथे शिवसैनिक’ या अभियानाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. यावर्षी नगरपालिकेत भगवा फडकवण्यात येईल असा निश्चय संजय देरकर यांनी केला.

Comments are closed.