भाजप वणीच्या सरचिटणीसपदी राकेश बुग्गेवार आणि संतोष डंभारे यांची निवड

भारतीय जनता पार्टी वणी शहर कार्यकारिणी घोषित

0

विवेक तोटेवार, वणी: भारतीय जनता पक्षाची वणी शहराची नवीन कार्यकारिणी घोषित झाली. नवनिर्वाचित शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार शहराध्यक्षपदी श्रीकांत पोटदुखे यांची तर सरचिटणिसपदी संतोष डंभारे आणि राकेश बुग्गेवार यांची निवड झाली.

Podar School 2025

कार्यकारणीची घोषणा वणी शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. शहराध्यक्षपदी श्रीकांत पोटदुखे, सरचिटणिस संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार, उपाध्यक्षपदी अरुण कावडकर, नीलेश होले, मनोज सरमुकदम, चंद्रकांत फेरवानी, राजू तिवारी, हनुमान उईके,अनुराग काठेड, वर्षा खुसपुरे, विजयालक्ष्मी जुनघरी, सचिव गणेश धानोरकर, सत्यजित ठाकुरवार, विजय मेश्राम, सुभाष वागडकर, रंजू झाडे, वैशाली वातीले तर कोषाध्यक्षपदी कुंतलेश्वर तुरविले इत्यादी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. तर कायम निमंत्रित सदस्यांमध्ये आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, तारेन्द्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, रवी बेलूरकर, महादेव खाडे, अभिनव भास्करवार, इत्यादिंचा समावेश आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात राकेश बुग्गेवार आणि संतोष डंभारे यांची खूप मोलाची कामगिरी आहे. प्रामाणिक आणि कर्तृत्त्ववान लोकनेतृत्वम्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. नगरसेवक म्हणून त्यांची कामगिरी भरीव आहे. कोणाच्याही अडीअडचणीत धावून जाणारे म्हणून त्यांचा लौकिक आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर गांभीर्याने बुग्गेवार आणि डंभारे काम करतात. त्यामुळे जनमानसात त्यांची लोकप्रियता ही वाढतीच आहे. यांच्या निवडीनं भाजपा, मित्रपरिवार आणि समाजात आनंदाचं वातावरण आहे. त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.