भरधाव कारची रोहीला धडक, रोही जागीच ठार

बोटोणीजवळ सकाळी झाला अपघात

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील बोटोणीजवळ एका कारने रोहीला जबर धडक दिली. यात अपघातात रोही जागीच ठार झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही धडक एवढी जबर होती की अपघात झाल्यानंतर अनियंत्रित झालेली कार सुमारे 150 फुट बाजूला झुडुपात गेली.

वणीहून सुझुकी सेलिरिओ ही कार (MH 34 BF7003) करंजीच्या दिशेने जात होती. दरम्यान हायवेवरून जात असताना बोटोणीपासून अर्धा किमी अंतरावर रस्त्याच्या मध्ये अचानक एक रोही आडवा आला. भरधाव असलेल्या कारने रोहीला जबर धडक दिली. या अपघातात रोही जागीच ठार झाला. धडकेमुळे अनियंत्रित झालेली रस्त्याच्या कडेला सुमारे 150 फुट दूर झुडुपात जाऊन थांबली. 

अपघात झाल्यानंतर तात्काळ एअर बॅग ओपन उघडल्याने चालक आणि सहप्रवासी किरकोळ जखमी झाले. या कारमध्ये 4 प्रवासी असल्याची माहिती आहे. जखमींना करंजी व वणी येथे दवाखान्यात उपचारासाठी नेल्याची माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

हे देखील वाचा:

ऑटो चालकाची पेट्रोलने जाळून घेऊन आत्महत्या

खासदार असदुद्दीन ओवैसीवर भ्याड हल्ल्याचे वणीत निषेध

Comments are closed.