नंदेश्वर देवस्थान येथे पार पडले रक्तदान शिबिर
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
जब्बार चीनी, वणी: दिनांक 1 सप्टेंबर रोजी वणीतील जगन्नाथ महाराज नंदेश्वर देवस्थानात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 78 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मराठा सेवा संघाच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. रक्तदान शिबिराला उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव जाधव तसेच वणी येथील डॉक्टर अर्शद शहा यांनी आवर्जून भेट दिली. विशेष म्हणजे ठाणेदार वैभव जाधव यांनी देखील शिबिरात रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबादास वागदरकर, ऋषीकांत पेचे, अजय धोबे, ॲड. अमोल टोंगे, ॲड. शेखर वऱ्हाटे, समीर लेनगुळे, दत्ता डोहे, मंगेश खामणकर, प्रदीप बोरकुटे, भाऊसाहेब आसुटकर, लक्ष्मण काकडे, मारोती जीवतोडे, संजय गोडे, वसंता थेटे, गितेश वैद्य, प्रवीण रोगे, अशोक चौधरी, सचिन रासेकर, नयन मडावी, नितीन मोवाडे यांच्यासह संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
Comments are closed.