पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वणीत महारक्तदान शिबिर पार पडले. मंगळवारी 22 जुलै रोजी शेतकरी मंदिर येथे झालेल्या या शिबिरात 355 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेडी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष व माजी जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात वणी तालुका ग्रामीण पूर्व मंडळात 119, वणी तालुका ग्रामीण पश्चिम मंडळात 121 आणि वणी शहर मंडळात 115 असे एकूण 355 रक्तदात्यांनी रक्तदान केले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य दिनकरराव पावडे, ज्येष्ठ नेते विजय पिदुरकर, माजी वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, ज्येष्ठ नेते महादेव खाडे, संध्या अवताडे, माजी जिल्हा महामंत्री रवी बेलुरकर यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय जनता पार्टी वणी विधानसभेतील सर्व मान्यवर, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर शिबिरासाठी तीनही मंडळांचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि लाइफ लाईन ब्लड बँक, नागपूर यांच्या संपूर्ण चमूने परिश्रम घेतले.




Comments are closed.