राजुर कॉलरीत घरफोडी, दागिने व रोकड लंपास

उपचारासाठी बाहेरगावी गेल्याने बंद घर पाहून चोरट्यांचा डाव

बहुगुणी डेस्क, वणी: पतीच्या उपचारासाठी नागपूर येथे गेल्याने घर बंद होते. मात्र चोरट्यांनी घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे 61,567 रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही घटना 21 जुलै रोजी सकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी विजया पेरकावार (57) या राजूर कॉलरी येथील रहिवासी आहे. गेल्या महिन्यात विजया यांच्या पतीची तब्येत खराब झाल्याने त्यांना उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. त्यामुळे त्या पतीसोबत नागपूरमध्येच होत्या. दरम्यान त्यांचे घर बंद होते. त्यांनी शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते.

21 जुलै रोजी विजया यांच्या शेजा-यांन फोन करून घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. त्यामुळे विजया तातडीने राजूर येथे घरी पोहोतल्या. तेव्हा त्यांना मुख्य दरवाजाचे आणि बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तुटलेले आढळले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त होते. त्यातून चोरट्यांनी चांदीची चेन, सोन्याची सोना मोतीचुर मुंदी, सोन्याची बास्केट रिंग, सोन्याची रिंग आणि 5,000 रुपये रोख लंपास केल्याचे आढळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 305(a), 331(1), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे.

Comments are closed.