यवतमाळ अर्बन बँक बँकिंग सोबत लोकहितार्थ कार्य करते: अजय मुंधडा

रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

0

नागेश रायपुरे, मारेगाव: यवतमाळ अर्बन बँक केवळ व्यवसाय करीत नसून देशकार्य व लोकपयोगी कार्य करते आपल्या तालुक्यात शवपेटी नव्हती आमचे सहकरी संचालक प्रशांत माधमशेट्टीवार ह्यांच्या नजरेस ही बाब आली आणि त्यांनी पुढाकार घेतला व आपल्या तालुक्यातील ऐक अडचण दूर केली बँक जिथे आपली शाखा आहे तिथे रक्तदान शिबिर घेत असते पण मारेगाव येथे शाखा नसतांना शिबीर यशस्वी होते हे केवळ आपले बँके प्रति असलेला प्रेम, जिव्हाळा या मुळे शक्य आहे. शेवटच्या घटकांपर्यंत बँकिंग पोचवायचा आमचा प्रयत्न आहे असे यवतमाळ अर्बन बॅंकेचे अध्यक्ष अजय मुंधडा हे मारेगाव येथील बदकी भवन येथे यवतमाळ अर्बन बँक व सेवा चॅरिटेबल फौंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिर व शवपेटी लोकार्पण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हासंघचालक गोविंद हातगावकर, रंगनाथ स्वामी पतसंस्था अध्यक्ष देविदास काळे, बँकेचे उपाध्यक्ष आशिष उत्तरवार, विभागीय अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भगवान गोंटीमुकुलवार, साह्य व्यवस्थापक तथा वणी विभाग सचिव श्रीधर कोहरे, मारेगाव पंचायत समिती सभापती शीतल पोटे, वैदयकीय अधिकारी प्रिया वानखडे ,वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे आदी व्यासपीठावर होते.

मान्यवरांनी बँकेच्या विविध प्रकारच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला बँकेचे संचालक गोवर्धन राठोड, नितीन खर्चे, ऍड प्रफुल चव्हाण, कर्मचारी संचालक मनीष गंजीवाले तसेच बँकेचे बँकेचे साह्य व्यवस्थापक अनिल शेंडे ,अनुप चमेडिया,राम गायकवाड ,वणी विभागीय अधिकारी जयवंत भगत, शाखा व्यवस्थापक गजानन ठोंबरे, अरविंद खाडे, घनश्याम कडू, पराग दवंडे, विजय सराफ अधिकारी भूषण सरमूकदम,अरुण राउलकर,विवेक बदूकले, प्रसाद नावलेकर, अर्जुन उरकुडे,रमेश सिंगमशेट्टीवार, आदी प्रामुख्याने हजर होते.

सामाजिक कार्यासाठी सामाजिक संस्थेचा सन्मान
हिंदु एकता मंच व साई मित्र परिवार तसेच स्वरधारा ग्रुप व संघर्ष बहु उद्देशिय सेवा संस्था मारेगाव यांचा सुध्दा कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गरजुवंत व राज्यातील तथा राज्या बाहेरील मजुर वर्गांना भोजन वाटप, किराणा किट वाटप केल्या बद्धल कोरोना योध्दा म्हणून शाल श्रीफळ व सन्मानचीन देऊन ग्रुप चा सत्कार करण्यात आला.

त्याच प्रमाणे संघाचे चंद्रशेखर बिडवाई, संघाचे जिल्हा कार्यवाह यादव भिडकर ,गोरक्षण आभूज,कुलदीप राशतवार,वणी तालुका संघचालक बंडूजी भागवत सह अनेक स्वयंसेवक होते. वणी चे व्यापारी सुशील मुथा डयानी सदलवार,संतोष थेरे,विजय काकडे, सह अनेक व्यापारी सभासद,खातेदार व मोठ्या प्रमाणात युवकांची व महिलांची उपस्थिती लाक्षणिक होती.

कार्यक्रमाअंतर्गत हिंदू एकता मंच,साई मित्र परिवार तसेच स्वरधारा ग्रुप व संघर्ष बहुउद्देशिय संस्था मारेगाव यांचा कोरोना योद्धां म्हणून सम्मान शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन करण्यात आला त्यात विविध संघटना ,संस्था चा सामूहिक सत्कार करण्यात आला विशेष वैद्यकीय अधिकारी प्रिया वानखडे,ठाणेदार जगदीश मंडलवार ह्यांचा सत्कार लाक्षणिक होता सभागृत टाळ्यांचा कडकडाट झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकविभागीय अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार हयानी करतांना बँकेच्या विविध योजना,कार्य व प्रस्तावित योजना सांगून बँक ग्राहकभीमुख कार्य कसे करते हे उदाहरणांसह सांगितले संचलन अधिकारी प्रमोद सप्रे ह्यांनी केले आभार बँकेचे उपाध्यक्ष आशिष उत्तरवार ह्यांनी केले.

रक्तदानाच्या कार्यक्रमाला डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर च्या टीम ने सहकार्य केले 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले .ज्यांनी रक्तदान केले त्यांना टिफिन बॉक्स,दिनदर्शिका, पेन, ड्राय फूड पाकीट,प्रशस्तीपत्र,मास्क आदी भेट वस्तू देण्यातकार्यक्रम यशस्वी करण्या करता सेवा चॅरिटेबल फाऊंडेशन वणीचे ऍड पौर्णिमा शिरभाते, सुरेंद्र नालमवार,रवींद्र धुळे,नितीन वासेकर,रवीढुमणे,रवींद्र गौरकर बँकेचे कर्मचारी दिलीप लोंदे,रंजित कुमरे,प्रमोद उरकुडे,जीवन चौधरी,रवी लोथे ,संजय राजूरकर ,विलास पचारे,गणेश गोहणे,विजया पुसनाके,संजय जिन्हावार, संजय रिठे,केतन लांभे,देविदास गेडाम,संजय पवार सह मारेगाव येथील विविध संघटनेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. मारेगाव येथील शासकीय कुटीर रुग्णालयात शवपेटी देण्यात आली असून तालुक्यातील जनतेला आकस्मित काळात लाभ घेता येईल. अशी माहीती बँकेचे अधिकारी प्रसाद नावलेकर हयानी दिली.

हे देखील वाचा:

छत्रपती महोत्सवात कोविड योद्ध्यांचा सत्कार

परदेशी मॉडेलसारखी सजवली जाते कॉलगर्ल (भाग 6)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.