बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत रक्तदान शिबिर

शेकडो कार्यकर्ते करणार प्रहार जनशक्तीमध्ये पक्षप्रवेश

0

विवेक तोटेवार, वणी: राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 5 जुलै रोजी वणीत रक्तदान शिबिर व पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम हा सकाळी 11 वाजता कनकवाडी येथील हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार कोरोनाचा काळ लक्षात घेता कोणताही गाजावाजा न करता वाढदिवस साजरा करण्याचे आदेश आले आहे. त्यानुसार वणीत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय याच ठिकाणी कार्यकर्ते पक्षात प्रवेश घेणार आहेत. रक्तदान शिबिराला इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहारचे अनिकेत चामाटे, साई नालमवार, नितीन गोरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.