विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नायगाव येथील नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळला. आज मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रमोद बापूजी विधाते (29) असून तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
प्रमोद हा म्हातारदेवी (घुग्गुस) येथील रहिवाशी होता. दोन दिवसांपासून तो गावाहून बेपत्ता होता. आज मंगळवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास पुनवट जवळील नायगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात गवक-यांना प्रमोदचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. त्यांनी याबाबत तात्काळ शिरपूर पोलीस स्टेशनला माहिती दिली.
शिरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृतकाने आत्महत्या केली नसून त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. प्रमोदला दारु पिण्याची सवय असल्याची माहिती मिळत आहे. प्रमोदच्या पश्चात विधवा आई आहे. घटनेचा तपास गंगाधर घोडाम करीत आहे.
हे देखील वाचा: