वणीत रविवारी बसपाची महत्त्वपूर्ण बैठक

विधानसभा व शहर कार्यकारिणी होणार गठीत

0

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 7 जुलै रोजी शहरातील विश्रामगृहामध्ये दुपारी 12 वाजता बहुजन समाज पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा कार्यकारिणी व शहर कार्यकारिणीची निवड होणार आहे.

दिनांक 2 जुलै रोजी जिल्हा बैठकीत जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या बैठकीत लवकरात लवकर विधानसभा व शहर कार्यकारिणी गठीत करण्याविषयीचे आदेश वरीष्ठांकडून देण्यात आले होते. त्याच अनुशंगाने वणीमध्ये कार्यकारिणीविषयी बैठक घेण्याचे ठरले आहे.

बसपाचे प्रदेश सचिव पंडितजी दिघाडे व प्रदेश सदस्य प्रकाश राउत यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यांच्यासह राजेंद्र कांबळे, शैलेश गाडेकर, सगीर अंसारी,  जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल शंभरकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण खानझोडे, जिल्हा महासचिव संजय तरवरे, जिल्हा सचिव नगरसेवक बाबु गणेश धवने, जिल्हा सचिव, रवि शंभरकर, जिल्हा सदस्य तथा महिला जिल्हा संयोजक निलीमा सुजित भैसारे या देखील उपस्थित राहणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या बैठकीसाठी वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व आजी माजी बसपा पदाधिकारी, समर्थक, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.