तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर लगतच्या मेंढोली येथे विजेचा धक्का लागून बैल ठार झाला. सदर घटना दि. 25 शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतात घडली. यात शेतकऱ्याचे 60 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहेत.
वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी मधुकर विठ्ठल कुटारकार यांच्या मालकीचा बैल आहे. बैलांना चराईसाठी सकाळी सोडले असता सदर घटना घडली. गावालगत असलेल्या ठेंगणे यांच्या शेतात जनावरे चरत होती. त्यावेळी शेतातून गेलेल्या मेन लाईनची तार अचानक तुटली. सदर ठिकाणी दहा बारा जनावरे चरत होती. तुटलेली वीजप्रवाहित तार कुटारकार यांच्या बैलाच्या अंगावर पडताच बैल घटनास्थळीच मृत पावला.
ऐन खरिपाच्या तोंडावर बैलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटारकार यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहेत. सदर घटनेचा पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र शासनाचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post