महादेव नगरीत घरफोडी, चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज केला लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका बंद घराचा दार गॅस कटरच्या मदतीने कापून चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज लंपास केला. मंगळवार 25 जुलै रोजी रात्री दरम्यान ही घटना घडली. याबाबत घरमालक मयूर नरेंद्र गोयनका (32) यांनी 27 जुलै रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

फिर्यादी महादेव नगरीत वास्तव्यास असून 25 जुलै रोजी सकाळी कुटुंबासह कामानिमित्त खामगाव येथे गेले होते. जाताना त्यांनी आपले दिवाणजी विनोद दाढे यांना घराकडे लक्ष देण्यास सांगितले. दिनांक 26 जुलै रोजी फिर्यादी खामगाव येथे असताना विनोद यांनी फोन करून घराचा दार उघडा असल्याचे सांगितले. सूचनेवरून घरातील सर्वजण परत वणी येऊन घराची पाहणी केली असता चोरट्यांनी बेडरूम मधील कपाट व देवघर तोडून समान अस्तव्यस्त केल्याचे दिसून आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चोरट्यांनी कपाटातील रोख 29 हजारसह सोन्याचा लॉकेट व अंगठी, चांदीचे भांडी, नाणे आणि देवघरातील चांदीची मूर्ती असे एकूण 69 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार फिर्यादी यांनी गुरुवारी सायंकाळी वणी पोलीस ठाण्यात नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द 454, 457, 380 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.