जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एचडीएफसी बँकेजवळ एका कारला आग लागली. आज शनिवारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. ओम प्रकाश भार्गव हे जुन्या एचडीएफसी बँकेजवळ, अभिरुची इन्स्टिट्यूटच्या बाजूला राहतात. त्यांच्याकडे टाटा कंपनीची कार (GJ24 A8923) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही कार लावली आहे. दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास घरासमोरून जाणा-या एका व्यक्तीला कारने पेट घेतल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच याची माहिती कार मालकाला दिली. माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच आज विझवली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यात कारचे सुमारे 1.5 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारने पेट घेतला त्याच्या शेजारी एक कचराकुंडी आहे. या जळालेल्या कच-यामुळे आग लागल्याचा कयास लावला जात आहे. अग्निशामक दलाचे जवान देविदास जाधव, शाम तांबे, दीपक वाघमारे यांनी आग विझवण्यास प्रयत्न केले.
Comments are closed.