BJS तर्फे मोफत कॅरिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

जितेन्द्र कोठारी, वणी : दहावीनंतर काय करायचं ? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. दहावीनंतर तुम्ही जी शाखा निवडतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. शक्यतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोर्ससाठी 10 वी 12 वी नंतर प्रवेश घेतात. यासाठी करियर मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्याला त्याची आवड व कल ओळखण्यासाठी मदत केली जाते. तसेच एखादा व्यवसाय निवडण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करते.

हाच हेतू समोर ठेऊन भारतीय जैन संघटनाने इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करिअरच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने मोफत करिअर गाईडन्स शिबिर आयोजित केले आहे. दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत येथील बाजोरिया लॉन्समध्ये आयोजित या शिबिरात राष्ट्रीय पातळीवर करिअर मार्गदर्शक तज्ञ डॉ. युगल रायळू हे मार्गदर्शन करणार आहेत.

या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जैन संघटना वणीचे अध्यक्ष प्रफुल खिंवसरा, सचिव विजय भंडारी, बीजेएस महिला शाखा विदर्भ उपाध्यक्ष सरोज भंडारी, वणी महिला शाखा अध्यक्ष संजना भंडारी यांचेवतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.