व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी मनोज नवले

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांची संघटना VOM व्हॉईस ऑफ मीडियाच्या वणी तालुकाध्यक्षपदी पत्रकार मनोज नवले यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी ही निवड केली आहे. पत्रकारांचे न्याय हक्क, पत्रकारांच्या कुटुंबाचे आरोग्य व शिक्षण, पत्रकारांची सुरक्षा इत्यादी कार्यासह सह लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी ही संघटना काम करते. VOM ही संघटना सध्या देशातील 13 राज्यात कार्यरत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात या संघटनेची बांधणी सध्या होत आहे. नामवंत पत्रकार व लेखक संदीप काळे हे या संघटनेचे अध्यक्ष असून राज्यातील अनेक नामवंत पत्रकार, संपादक व मीडिया क्षेत्रातील दिग्गज लोक या संघटनेशी जुळले आहे. मनोज नवले यांच्या नेतृत्वात वणी तालुक्यात लवकरच कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. तालुक्यातील इच्छुक पत्रकारांनी संपर्क साधावा असे आवाहन मनोज नवले यांनी केले आहे. मनोज नवले यांच्या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.