शिबल्याजवळ रस्ता रुंदीकरणाच्या कामात सापडले कोरीव दगडी खांब

खांब ठरले परिसरात कुतुहलाचा विषय, राजवाड्याचे खांब असल्याच्या चर्चेला ऊत

0

सुशील ओझा, झरी: सध्या तालुक्यातील शिबला ते पांढरकवडा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याच मार्गावरील शिबला-पार्डी या वळण रस्त्यावर काही दगडी खांब आढळले आहेत. हे दगडी खांब सध्या परिसरात कुतुहलाचा विषय ठरत असून हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे. याबाबत परिसरातील नागरिक विविध तर्क वितर्क लावले जात असून सदर खांब हे राजवाडयाचे खांब असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

झरी ते पांढरकवडा या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. या मार्गावरील शिबला-पार्डी जवळ घाट आहे. सहा वर्षांआधीही या परिसरात अशा प्रकारचे दगड (खांब) सापडले होते. याशिवाय जवळच असलेले कायर हे एक ऐतिहासिक ठिकाण असल्याने तिथे अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या परिसराचाही काही इतिहास असल्याचे बोलले जात आहे.

सदर खांब ऐतिहासिक नसून भौगोलिक खडक: प्रा. सुरेश चोपणे
सदर खांब हे षटकोणी असून ते हुबेहुब कोरले असल्यासारखे भासतात. त्यामुळे हे राजवाड्याचे असल्याचे तर्क लावले जातात पण ते निरर्थक आहे. झरी परिसरात असे खांब ठिकठिकाणी आहेत. सहा वर्षांआधी या परिसरात संशोधन करीत असताना मला असे खांब आढळून आले होते. त्याचा अभ्यास केला असता सदर खांब भौगोलिक पद्धतीने तयार झाल्याचे आढळून आले. सदर खांबांना ‘कॉलम नॉर बेसॉल्ट’ म्हटले जाते. ज्याला सोप्या भाषेत आपण ज्वालामुखीतून तयार झालेले दगडी खांब ही म्हणू शकतो. सदर खांब हे भौगोलिक असल्याने त्याला पौराणिक किंवा धार्मिक दृष्टीकोणातून कुणीही बघू नये.
– सुरेश चोपणे, पुरातत्व व भुशास्त्र अभ्यासक

Ankush mobile

सध्या हे खांब बघण्यासाठी लोक दुरदुरून येत आहेत. जवळच असलेल्या कायर हे पुरातन गाव आहे. तेथे अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळून आल्या आहेत. कायर येथे सातवाहनाचे राज्य असल्याने या झरी परिसरात काही आढळल्यास त्याला ऐतिहासिक गोष्टींशी संदर्भ जोडून पाहले जाते. तसेच या भागात गोंडी राजाचे वास्तव्य असण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे इथे गोंडी राजाचा संदर्भ देखील लागत नाही, अशी माहिती विदर्भातील सुप्रसिद्ध पुरातत्व व भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

One Day Ad

हे देखील वाचा:

वणी जवळ आढळली पृथ्वीवरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!