जितेंद्र कोठारी, वणी: पत्नीला 3 वेळा तलाक बोलून सोडचिठ्ठी देणा-या नव-यावर वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान दिवान खान (40) रा. रविनगर असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून तो वणी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहे. मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा 2019 नुसार परिसरातील ही पहिलीच कारवाई असल्याचे मानले जात आहे. नवीन कायद्यानुसार तोंडी 3 वेळा तलाक बोलणे, एसएमएस किंवा फोन करून सोडचिठ्ठी करणे देणे हे बेकायदेशीर मानले गेले आहे.
सविस्तर वृत्त असे की इमरान दिवान खान (40) हा पोलीस ठाणे वणी येथे पोलीस नाईक पदावर आहे. तो रवीनगर वणी येथे राहतो. तब्बसुम इमरान खान (38) रा. पोलिस वसाहत वणी ही इमरानची दुसरी पत्नी आहे. तर पहिली पत्नी यवतमाळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे. इमरानने तबस्सूम सोबत दुसरे लग्न करून तो तिच्यासह पोलीस वसाहत वणी येथे राहत होता.
दि. 1.4.2019 ला आरोपी इमरान हा यवतमाळ येथे जातो म्हणून घरून निघाला आणि 17 महिन्यानंतर परत आला. कोणतीही माहिती न देता तो रविनगर येथे खोली करून राहत असल्याची माहिती तबस्सूमला मिळाली. गेल्या वर्षी पत्नी तबस्सूम हिने इमरानच्या खोलीवर जाऊन जाब विचारले असता त्यांनी मला तुझ्या सोबत राहायचे नाही. मी तुला खावटी महणून 7 लाख रुपये देतो. असे म्हणून तिला 2.5 लाख रुपये दिले. तसेच उर्वरित रक्कम जून 2021 मध्ये देतो असे म्हणाला. मात्र इमरानने अद्यापही पैसे दिले नाही.
दि. 4 जुलै रोजी आरोपी पोलिस कर्मचारी इमरान हा पोलीस वसाहतीत आला. दरम्यान पत्नी तब्बसुमने आपण एकत्र राहू असा आग्रह धरला. त्यामुळे दोघात वाद होऊन इमरानने पत्नीला थापडा मारून तीन वेळ तलाक… तलाक… तलाक म्हटले व तो घरून निघून गेला. याबाबत तबस्सूमने दि. 8 ऑक्टो. रोजी रात्री 12.10 वाजता वणी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह अधिकार कायदा कलम 4 व सह कलम 498 (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पुढील तपास एपीआय माया चाटसे करीत आहे.
मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा 2019 नुसार परिसरातील ही पहिलीच कारवाई असल्याचे मानले जात आहे. नवीन कायद्यानुसार तोंडी 3 वेळा तलाक बोलणे, एसएमएस किंवा फोन करून सोडचिठ्ठी करणे देणे हे बेकायदेशीर मानले गेले आहे. तसेच नवीन कायद्यानुसार पत्नीला खावटी तसेच इतर अधिकारही प्राप्त झाले आहे.
हे देखील वाचा:
लैंगिक अत्याचाराला त्रासामुळे शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
Comments are closed.