जितेंद्र कोठारी, वणी : लग्नात भेट स्वरूपात मिळालेल्या पैश्यातून ए.सी.व फ्रीज खरेदी करण्यासाठी तसेच विविध कारणांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छल तसेच तिच्या इच्छे विरुद्ध दोनदा गर्भपात केल्या प्रकरणी पतीसह सासू व नणंदेवर वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वणी तालुक्यातील माहेर असलेल्या 32 वर्षीय विवाहितेनी फिर्याद नोंदविली आहे. आशीष दिलीप उके (34), साधना दिलीप उके (55) दोघं रा. त्रिमूर्ती नगर वर्धा व प्रिया विक्रांत सातपुते (32) रा. सिव्हिल लाइन नागपूर अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहे. ऑक्टोबर 2019 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत मुंबई व वर्धा येथे हा प्रकार घडला.
फिर्यादी पीडित महिलेनी 29 जुलै रोजी वणी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार शहरालगत गावात तिचा माहेर आहे. तिचा विवाह 7 एप्रिल 2019 रोजी वर्धा येथील रहिवासी आशीष दिलीप उके सोबत वणी येथील जन्नत हॉटेलमध्ये बौद्ध धर्माच्या रीतिरिवाज प्रमाणे झाला होता. लग्नात तिच्या आई व भावांनी 20 लाख रुपये खर्च केले. तसेच सोन्याची चेन व अंगठी त्याच्या पतीला दिली. लग्नानंतर ती आपल्या पतीकडे मुंबई येथे नांदावयास गेली असता सुरुवातीचे 4 महीने पती आणि कुटुंबियानी तिला चांगली वागणूक दिली. परंतु त्यानंतर पती व सासू यांनी लग्नात भेट म्हणून मिळालेल्या पैश्यातून ए.सी. व फ्रीज खरेदी करण्यासाठी तगादा लावला. तिनं नकार दिला असता पतीने तिला मानसिक व शारीरिक छल देण्यास सुरवात केली. त्यात पतीची आई त्याला छल करण्यास चिथावणी देत होती.
ऑक्टोबर 2019 मध्ये विवाहितेनी ती गर्भवती असल्याची आनंदाची बातमी पती आशीष उके यास सांगितली. त्यावर पती आशीष यांनी आताच बाळ नको म्हणून बळजबरीने गर्भपात करण्याच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. त्यानंतर पती तिच्याकडे लक्ष देत नसल्याने संशयावरून फिर्यादी हिने पतीचा मोबाइल तपासला असता एक मुलीसोबत व्हॉटअप चॅटिंग करीत असल्याचे तिला आढळले. याबाबत तीन विचारपूस केली असता सदर मुलीसोबत तिच्या पतीचे विवाहपूर्वी संबंध असल्याचे उघड झाले. एप्रिल 2020 मध्ये पीडित महिला दुसऱ्यांदा गरोदर राहिली असता पती आशीष व सासू साधना हिने तिची इच्छा नसताना बळजबरीने गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.
त्यानंतर पती, सासू तसेच नागपूर येथील तिची नणंद प्रिया विक्रांत सातपुते ही नेहमी तिला मानसिक त्रास द्यायचे. दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी पती आशीष यांनी तिच्या सोबत भांडण करून तिला बळजबरीने बेगॉन स्प्रे ही मच्छर मारण्याची औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दि. 26 जानेवारी रोजी आशीष यांनी पत्नीचे केश पकडून बेदम मारहाण केली. पतीच्या मारहाणीत करताना तिची सासू व नणंद त्याला चिथावणी देऊन छल करण्यास प्रवृत करीत होत्या. दर रोज होणाऱ्या छल व मारहाणीला कंटाळून पीडिता आपल्या आईच्या आश्रयात माहेरी आली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसानी आरोपी पती, सासू व नणंद विरुद्ध कलम 294, 393, 34, 498 (अ) व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार पो. नि. अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पो. ह. विठ्ठल बुरेवार करीत आहे.
Comments are closed.