कोलारपिंपरी खाणीत सीबीआय व विजिलेन्सची धाड

अनेक महत्त्वाच्या फाईल जप्त, कारवाई सुरूच

0

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ एरियाच्या कोलारपिंपरी खाणीत सीबीआय आणि विजिलेन्सने धा़ड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हा छापा मारण्यात आला. आलेल्या अधिका-यांनी कोलारपिंपरीच्या स्टॉकयार्डमध्ये जाऊन कोळशाची तपासणी सुरू केल्याची माहिती आहे. सदर धाड कोणत्या कारणांसाठी मारण्यात आली आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रोडसेलमध्ये उच्च प्रतिच्या कोळशाची विक्री होत असल्याच्या कारणावरून सदर धाड मारण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज शुक्रवारी दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान सीबीआय आणि विजिलेन्सच्या पथकाने कोलारपिंपरी खाणीत धाड टाकली. या पथकात सुमारे 10 ते 12 अधिकारी असल्याची माहिती आहे. सोबतच दुस-या क्षेत्रातील सर्वेअर टिम देखील या ठिकाणी पोहोचली आहे. सदर पथकाने स्टॉकयार्ड येथील कोळशाची तपासणी सुरू केली आहे. तसेच संबंधीत अधिकारी व कर्मचा-यांची अनेक तासांपासून चौकशी सुरू आहे.

या धाडीत पथकाने खाणीशी जुळलेले अनेक कागदपत्रे, स्टॉक रजिस्टर, डिस्पॅच रेकॉर्ड, डीओबुक यासह अनेक महत्त्वाच्या फाईल ताब्यात घेतल्या आहेत. वृत्त लिहे पर्यंत पथकाच्या हाती काही विशेष माहिती हाती नसल्याची माहिती आहे. दरम्यान पथकाची चौकशी अद्यापही सुरूच होती.

हे देखील वाचा: 

शनिवारी संध्याकाळपासून लागणा-या लॉकडाऊनला स्थगिती

Leave A Reply

Your email address will not be published.