जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी दिनांक 24 जून रोजी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने मनीष नगर वणी येथील विश्वशांती बुध्द विहार येथे जेष्ठ पौर्णिमा साजरी करण्यात आली. जेष्ठ पौर्णिमेला बौध्द धम्मात अनन्य साधारण महत्व आहे. कार्यक्रमाला दुपारी 3 वाजता बुद्धवंदना घेऊन सुरूवात झाली. कार्यक्रमाला अध्यक्ष प्रवीण वनकर होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश तेलंग, वैशाली पाटील इ. होते.
बुध्दजीवनात प्रत्येक पौर्णिमेला कोणती ना कोणती महत्त्वाची घटना घडली आहे. जेष्ठ पौर्णिमा ही चार घटने मुळे महत्वाची आहे. बुद्धांचे सर्वप्रथम उपासक तपस्सु आणि भल्लक यांना या दिवशी धम्म दीक्षा मिळाली होती. बुद्धांना बोधी प्राप्त होण्याच्या वेळी बुद्धाला खिर देणा-या सुजातालाही याच दिवशी धम्म दीक्षा देण्यात आली. सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा यांनी श्रीलंका येथे धम्म प्रचाराला प्रयाण केले होते. तसेच याच दिवशी महेंद्र यांचे परिनिर्वान झाले होते. या दिवशीची अशी विविध माहिती मान्यवरांनी उपस्थितांना दिली.
आनंद पाटील, उल्हास पेटकर, दादाजी घडले, हरेंद्र जंगले, गौतम धोटे यांनीही यावेळी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले. सरणतय गाथेने कार्यक्रम समाप्त झाला. कार्यक्रमाचे संचालन ललिता तेलतुम्बडे यांनी केले तर आभार नलिनी थोरात यांनी मानले. कार्यक्रमाला रामटेके, दुबे, नगराळे, पेटकर, खैरे, बूरबूरे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
हे देखील वाचा:
[…] […]