पी दारु, पी दारू…बहुत दिनो के बाद मिली है यह “दारु’

अखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारु विक्रीचा मार्ग मोकळा

0

जितेंद्र कोठारी, वणी: सीमेलगत चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविल्याचे शासन निर्णयासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील तळीरामाना मनसोक्तपणे दारु पिण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवार 8 जून रोजी गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविणे व त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाहीबाबत अधिसूचना निर्गमित केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील देशी अनुज्ञप्ती दुकाने, बार व परमिटरूम सुरु होणार आहे. त्यामुळे आता वणीतील दारु तस्करांना दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे. याशिवाय परिसरातील अनेकांना थोड्याश्या पैशासाठी दारूची अवैधरित्या वाहतूक करावी लागत होती, त्याची आता अवैध धंद्यातून सुटका होणार आहे.

दारुबंदी असताना चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यप्रेमी तलफ भागविण्यासाठी मिळेल त्या भावाने दारु खरेदी करीत होते. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तळीराम फक्त दारु पिण्यासाठी दररोज वणीत येत असतात. त्या मद्यप्रेमीनाआता चंद्रपूर जिल्ह्यातच दारु उपलब्ध होणार आहे. मंगळवारी निर्गमित अधिसूचनेत जिल्ह्यातील परवानाधारक दारु विक्रेत्यांचे लायसन्स नूतनीकरण बाबत एक खिडकी योजना राबवून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे

अनेकांनी गमावले अपघातात प्राण
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अनेक लोक खास पार्टीसाठी वणीत यायचे. यात दुचाकीने येणा-यांचे प्रमाण अधिक होते. पार्टी करून परत जाताना शेकडो अपघात झाले. यात अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेक गंभीर जखमी झालेत. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढत होते. अनेक लोक लग्नासाठी वणी किंवा परिसरात आले की मनसोक्त ढोसून पुढे जायचे. त्यातून हे अपघात व्हायचे. याशिवाय चंद्रपूरहून पार्टीसाठी वणीत आलेल्यांचे अनेकादा बारमध्ये भांडण देखील झाल्याच्या काही घटना उघडकीस आल्या होत्या.  

1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात देशी विदेशी मद्यची विक्री, साठवणूक व पिण्यावर बंदी घालण्यात आली होती. तत्कालीन भाजप सरकारने ही बंदी घातली होती. मागील सहा वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कागदावर होती. वास्तविक पाहता जिल्ह्यात दररोज लाखों रुपयांची दारू तस्करीमार्फत आणली व विकली जात होती. चंद्रपूर जिल्ह्यासह यवतमाळ व वणी तालुक्यातील अनेक तरुण व नाबालीगसुद्दा दारु तस्करीच्या धंद्यात गुंतले होते. दारु तस्करीमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले होते.

राज्यात शिवसेना, राकापा व कांग्रेस पक्षाची सरकार सत्तेत आली तेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविण्याची हालचाल सुरु झाली होती. जिल्ह्यात दारुबंदी उठविल्यास होणारे परिणाम तसेच नफा नुकसानीचे आकलन करून अहवाल सादर करण्यासाठी माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीने दिलेले अभिप्राय, निष्कर्ष व शिफारशीच्या आधारेवर शासनाने दारुबंदी हटविल्याचे सांगण्यात येते.

हे देखील वाचा:

दुसरी लाट वेगाने ओसरतेय, सलग दुस-या दिवशी एकही रुग्ण नाही

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.