चर्मकार महासंघाची पुरड येथे शाखा गठीत

प्रवीण डुबे अध्यक्षपदी तर रोहीत भटवलकर सचिव

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रीय चर्मकार महासंघाची वणी विभागात पुरड (नेरड) येथे स्थापना करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन दौलत वाघमारे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे होते. तर जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे व विष्णुदास काकडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शाखा अध्यक्षपदी प्रवीण उत्तमराव डूबे, उपाध्यक्ष पदी कवडुजी बांगडे तर सचिवपदी रोहित भटवलकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटना खेडोपाडी पोहचवण्याचा मानस नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण डूबे यांनी व्यक्त केला.

यावेळी संपर्क प्रमुख ज्योती येरेकार, सुभोध बांगडे, किसन कोरडे, भारत लिपटे, किशोर हांडे, रामा कोल्हे, श्याम गिरडकर यांच्यासह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी आणि संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेरड पुरड शाखा सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.