रोहन आदेवार, कुंभा: टाकळी(कुंभा) येथे विषबाधेने उपचार दरम्यान मृत्यू झालेल्या शंकर विठ्ठल गेडाम यांच्या कुटुंबियांना अखेर शासनाची मदत मिळाली आहे. दि.17 सप्टेंबर ला त्यांचा फवारणी करताना मृत्यू झाला होता. वणी बहुगुणीने याविषयी बातमी प्रकाशित केली होती. अखेर त्यांना उशिरा का असेना मदत मिळाली आहे.
मारेगाव तालुक्यात चार शेतकरी, शेतमजुरांचा फवारणी करताना मृत्यू झाला. त्यातील तीन शेतकऱ्यांना जलद धनादेश मिळाला, परंतु टाकळी येथील शेतकऱ्याला धनादेश प्राप्त न झाला नव्हता. अखेर मारेगावचे तहसीलदार विजय साळवे, कृषी अधिकारी आर.आर.दासरवार व इतरअधिकाऱ्यांनी दि.16 ऑक्टोबर 2017 ला मृत कुटुंब यांची भेट घेतली व त्या वेळी मृताच्या कुटुंबाच सांत्वन करून त्यांना कुटुंबास शासनाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
दि. 23 आँक्टोबर सोमवारला त्यांना शासनाची मदत मिळाली. या आधी मृताच्या कुटुंबियांना तहसील मार्फत वीस हजार रुपयाचा धनादेश आला होता. सोमवारी त्यांना दोन लाख रुपयांचा धनादेश विजय साळवे (तहसीलदार मारेगाव), तलवारे (BDO), वरारकर (पटवारी मारेगाव) व संगीता रा आदेवार (पोलीस पाटील) व उत्तम आत्राम (कोतवाल) व उपस्थित गावकऱ्यांच्या देण्यात आला. हा धनादेश मृत शंकर गेडाम यांच्या पत्नी विठाबाई गेडाम यांना देण्यात आला.
गावाची सुरक्षा हि गावातील लोकांनी ठेवली पाहिजे या साठी दक्षता समिती स्थापन करा व कार्य करा गाव हा स्वच्छ सुंदर हागणदारीमुक्त व्यसनमुक्त करायला पाहिजे असे मत यावेळी तहसीलदार यांनी व्यक्त केली. काही कारणास्तव त्यांना उशीरा मदत मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.