वणीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, रस्त्यावर उतरून केला निषेध

पंतप्रधानाच्या विधानाचा जोरदार निदर्शने करीत निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. या आरोपामुळे काँग्रेस आक्रमक झाली असून याचा वणीत काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने करीत निषेध केला आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत देशभरात कोरोना पसरण्यास महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका करत काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईहून मजुरांना देशभरात पाठवले. त्यामुळेच देशभरात कोरोना पसरवला असा आरोप केला होता. यामुळे महाराष्ट्र काँग्रेस संतापली होती. नाना पटोलेंनी याबाबत निषेध आंदोलन पुकारले आहे.

वणीत देखील पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘माफी मांगो मोदी’ म्हणत पंतप्रधान मोदी यांच्या विधानांचा निषेध केला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी ओम ठाकूर, प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद लोणारे, संतोष पारखी, सलीम खान, पुरुषोत्तम आवारी, मोरेश्वर पावडे, रफीक रागरेज, राजाभाऊ बिलोरीया, जयसिंग पाटील गोहोकर, मोहन पानघाटे, रवि कोटावार, सुनील वरारकर, भैयाजी बदखल, विलास मांडवकर, पवन एकरे, संजय खाडे, कैलास पचारे, तेजराज बोढे, प्रभाकर मंथनवार, मारोती मोवाडे, महादेव दोडके, राजीव डवरे, संध्या बोबडे, वंदना आवारी, वंदना धगडी, जया उरकुडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

मारेगाव नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली, काँग्रेसचा बहुमताचा दावा

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.