‘द बर्निंग कन्टेनर’… गौराळा स्टॉपवर पहाटे थरार

शेतक-याची तत्परता, अन् मोठा अनर्थ टळला...

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव वणी हायवेवर शुकवारी पहाटे ५.३० वाजता चालत्या सिमेंट कन्टेनरला अचानक आग लागली. मात्र वेळीच तिथे असलेल्या शेतक-यांनी तातडीने धाव घेऊन कन्टेनरची आग आटोक्यात आणली, परिणामी होणारा मोठा अनर्थ टळला.

प्राप्त माहिती नुसार कन्टेनर (क्र एम एच ३४ बीजी ९७७७) हा पहाटेच्या वेळी चंद्रपूर कडून यवतमाळ कडे जात होता. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास मारेगाव पासून ६ कि मी अंतरावर असलेल्या गौराळा स्टॉपवर चालत्या कन्टेनरला अचानक शार्ट सर्कीट मुळे आग लागली. स्टॉपवरच्या लोकांनी याची माहिती कन्टेनर चालक मंगल सोनटक्के यांनी दिली,

शेतक-याची तत्परता आणि अनर्थ टळला…
घटनास्थळा जवळील शेतकऱ्यांना जळत्या कन्टेनरचे आगीचे लोळ दिसताच आपल्या शेतातील बोर सुरू करून ट्रक पर्यंत पाईपलाईन जोडली. त्या पाईपने त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. यावेळी प्रवास करणारे दुचाकी चालक अनिल कणगाले, संदीप जुनगरी, फैजान शेख, सुरेश कोडापे यांनी आग विझविण्यास मदत केली. या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.