बुधवारी तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण

यवतमाळहून प्राप्त झालेत 36 अहवाल

0

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये 7 रुग्ण हे आरटीपीसीआर (स्वॅब) टेस्टनुसार आलेत तर 4 रुग्ण हे ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 484 झाली आहे. बुधवारी यवतमाळहून 36 अहवाल प्राप्त झाले. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 29 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. याशिवाय आज 20 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 16 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.

Podar School 2025

आज 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 120 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात 484 पॉजिटिव्ह व्यक्ती झाल्यात. यातील 320 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 153 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 10 झाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जैन ले आऊटमध्ये कोरोनाचे 2 रुग्ण
बुधवारी आलेल्या अहवालानुसार Bdnc H qurter येथे 1, सिंधी कॉलनी येथे 1, जिजाऊनगर येथे 3, जैन ले आऊट येथे 2, वाघदरा येथे 2, सेवानगर येथे 1 तर पेटूर येथे 1 रुग्ण आढळून आला.

आज 26 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 26 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 153 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 60 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 93 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 16 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 85 व्यक्ती भरती आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.