जब्बार चीनी, वणी: वेकोलि वणी नार्थ व वणी एरीयाचे महाव्यवस्थापक आर के सिंह आणि उदय कवळे यांनी मंगळवारी टीम वेकोलिच्या वतीने यवतमाळचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कोरोना व्हायरसमुळे उद्भववलेल्या संकटामध्ये गरीब आणि बेघरांसाठी कंपनीने दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्हाधिका यांना सुद्धा 25 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी वेकोलि ने 15 कोटीची तरतूद केली आहे. या अंतर्गत यवतमाळ, चंदपुर, नागपूर, छिंदवाडा आणि बैतूल जिल्ह्यासाठीही 25 – 25 लाखांची तरतूद करण्यात आली असून, त्याचा उपयोग संबंधित जिल्हा दंडाधिका-या मार्फत करण्यात येणार आहे.
या व्यतिरिक्त कंपनीच्या सर्व क्षेत्रे आणि मुख्यालयांनीही गेल्या आठवड्यापासून गरजू लोकांना पुरेशा प्रमाणात अन्न पुरवण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी वेकोलिच्या सर्व कर्मचा-यांनी आपला एक दिवसाचा पगार व सर्व महाप्रबंधकांनी आपला तीन दिवसांचा पगार पीएम केअर फंडमध्ये दिला आहे.
कोरोना आजाराच्या जीवघेण्या संसर्गामुळे आज सारे जग चिंताग्रस्त आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात संपर्कामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका लक्षात घेता केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना करत अनेक शासकीय कार्यालया सोबत अनेक औद्योगिक कारखानेही बंद केले आले.
रेल्वे व विमाने सारखे प्रचंड उलाढाल असलेले क्षेत्र ही केंद सरकारने बंद केले असून लोकांचा सार्वजनिक संपर्क आटोक्यात येण्याकरता पूर्ण प्रयत्न केले जात असताना वेकोलि प्रशासनाने या परीस्थितीतही मात्र आपले उत्पादन चालूच ठेवुन राष्ट्रहित सर्वोपरी हे दाखवून दिले आहे .