सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी व एक साफसफाई करणारा खाजगी कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह निघालेत. पाटण पोलीस स्टेशनमधील एक कर्मचारी याला पांढरकवडा येथे तपासणी केली असता तो पॉजिटिव निघाला. त्यामुळे ठाणेदार अमोल बारपात्रे यांनी आपल्या संपूर्ण 25 कर्मचाऱ्यांची तपासणी 29 ऑक्टोबरला पांढरकवड़ा येथे करवून घेतली.
त्यानुसार त्यातील एक अधिकारी व 3 पोलिस कर्मचारी व खाजगी कर्मचारी पॉजिटिव आले आहे. ठाण्यातील इतर काही कर्मचारी यांचे रिपोर्ट अजून प्राप्त झाले नाही. इतरांच्या मनातही भीती निर्माण झाली आहे. ठाण्यात कर्मचारी कमी. त्यात कर्मचारी पॉजिटिव्ह आढळलेत.
इतरही कर्मचारी पॉजिटिव आल्यास पोलीस स्टेशनचा कारभार कसा चालेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सर्व कर्मचारी व अधिकारी ड्यूटी व गणनेच्या वेळी एकत्र येतात. त्यामुळे शंका व्यक्त होत आहे. पोलिस कर्मचारी यांना कोरोनाची लागण होताच गावकऱ्यांसुद्धा भीती निर्माण झाली आहे.
तक्रार देणारे व घेणाऱ्या कर्मचाऱ्यांतही भीती निर्माण झाली आहे. पॉजिटिव्ह कर्मचारी होम क्वारेनटाईन करण्यात आले आहे. तर 2 ऑक्टोबरला कंटेंटन्मेंट झोन तयार करण्यात येणार आहे. तालुक्यातील मुकुटबन येथे 14 व पाटण येथील 5 असे एकूण 19 पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे.
.