जब्बार चीनी, वणी: काल गुरूवारी 9 रुग्ण पॉजिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा 9 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहे. यातील 4 रुग्ण शास्त्रीनगर, तर चिंतामणी अपार्टमेन्ट येथे 2 व वरद अपार्टमेन्ट येथे एक रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात 2 रुग्ण निष्पन्न झाले आहे. यातील एक रुग्ण शिंदोला, एक रुग्ण चिंचोली येथील आहे.
एकीकडे पोलीस विभागातील कर्मचा-याची साखळी वाढत असतानाच आज शास्त्री नगरनेही चौकार हाणला आहे. इथे आज 4 रुग्ण आढळून आले आहे. पोलीस कर्मचा-याची साखळी वाढून ती आता छोरिया टाऊनशिप नंतर लगत असलेल्या वरद अपार्टमेन्ट येथे पोहोचली आहे. तसेच
गणेशपूर येथील नदीलगत असलेलं चिंतामणी अपार्टमेन्ट इथे देखील या साखळीने पाय पसरवले आहे. चिंचोली येथील रुग्णामुळे कोरोनाचा शिंदोला येथे शिरकाव झाला. आता शिदोल्यासह चिंचोलीतही रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज या दोन्ही गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहे.
आज यवतमाळ येथे पाठवलेले 7 रिपोर्ट आले. हे सर्व रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहेत. तर आज 26 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली यातील 2 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आल्या आहेत. आज 35 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर अद्याप 63 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
आतापर्यंत 1024 रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या असून 1257 RT- PCR (स्वॅब) टेस्ट करण्यात आली आहे. आज 9 रुग्ण आढळल्याने वणतील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 9 झाली असून यातील यातील 51 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर सध्या 37 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील 33 व्यक्तींवर वणीतील कोविड केअर सेन्टर येथे उपचार सुरू असून 4 व्यक्तींवर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू आहे. सध्या शहरी भागात 5 तर ग्रामीण भागात 9 कन्टेन्मेंट झोन आहेत.