नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या दोन तीन दिवसात अचानक रुग्णसंख्या वाढल्यानंतर आज 10 मे रोजी तालुक्यात अवघे 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने दिलासा मिळाला. तर 18 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करीत घरी परतले आहे. दरम्यान मारेगाव, मजरा, सिंधी येथील तीन पुरुषांचा कोरोना मुळे मृत्यू झाला.
तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 384 आहे. यापैकी 345 होम आयसोलेशन आहे. मारेगाव येथील कोविड सेंटर वर 25 रुग्ण तर 10 रुग्ण खासगी दवाखान्यात तसेच 4 रुग्ण डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर मध्ये उपचार घेत आहे.
आज रॅपीड टेस्ट द्वारे 120 व्यक्तीची तपासणी केली असता त्यात तालुक्यातील 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच आरटीपीसीयार चे 516 रिपोर्ट यवतमाळ वरून येणे बाकी आहे. कोरोना सोबतच तालुक्यात ग्रामीण भागातील “सारी” आजाराचे दोन रुग्ण आढळले आहे. लक्षणं आढळलेल्या दोन्ही रुग्णांना यवतमाळ येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. दरम्यान
काय आहेत सारीचे लक्षणं?
कमी कालावधीत ताप, खोकला आणि दम लागणे किंवा श्वास घेता न येणे ही लक्षणं सारीचे आहेत. व्हायरल इन्फेकशन (विषाणू संसर्ग) स्वाइन फ्लू, कोरोना, बॅक्टरीअल इन्फेकशनमुळे (जिवाणू संसर्ग) सारी होऊ शकते. न्युमोनिया हे सुद्धा सारीचे एक लक्षण आहे. कोरोना या आजारात सारीची बरीच लक्षणे साम्यपणे आढळतात. मात्र याबाबत घाबरण्याचे कारण नाही असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
हे देखील वाचा: