नागेश, रायपुरे, मारेगाव: तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून आज आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात आज बुधवारी 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे तर 12 पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते कोविड सेंटरवर उपचार घेऊन घरी परतले आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 232 झाली आहे.
बुधवारी RTPCR द्वारे 114 तर RAPID द्वारे 79 लोकांनी कोरोना तपासणी केली असता यात 23 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असल्याने गाव खेड्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनास सहकार्य करा– अरुण मोकळ (मुख्याधिकारी मारेगाव)
प्रशासनास सहकार्य करा- अरुण मोकळ (मुख्याधिकारी मारेगाव)
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शक्य तो बाहेर निघणे टाळावे.लक्षणे दिसतात नागरिकांनी मनात कुठलीच भीती न ठेवता कोविड सेंटर वर जाऊन कोरोना तपासणी करावे. व आपली व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी संचारबंदी च्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
हे देखील वाचा:
कोरोना विस्फोट, आज तालुक्यात 168 रुग्ण तर 63 व्यक्तींची कोरोनावर मात
सावधान….! लॉकडाउनच्या नियमांचा भंग करणाऱ्या 36 जणांविरुद्ध गुन्हा दाखल