मार्डी येथे तात्काळ कोविड केअर सेंटर सुरू करा

भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मार्डी विभागातील गावागावात कोरोना रुग्णाच्या संख्येत जपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्डी येथे “कोविड सेंटर” सेंटर तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

जवळपास 20 ते 25 गावांचे केंद्र स्थान व मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून मार्डी या गावाला ओळखले जाते.या विभागातील मार्डी सह गाडेगाव, देवाळा, किन्हाळा, चिंचमंडळ, आदी गावात कोरोना रुग्णाची संख्या मोठया झपाट्याने वाढत आहे. त्यातच पॉझिटिव्ह रुग्णांना होम कोरोनटाईन देण्यात येत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह येत आहे.

तालुका स्थळावर असलेल्या कोविड सेंटर वर बेड ची संख्या कमी असल्याने,आपत्कालीन परस्तीती लक्षात घेता,मार्डी विभागातील गावागावांत कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता मार्डी येथे कोविड सेंटर चालू करण्याच्या मागणी साठी भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तहसीलदार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भा.यु.मो.चे जिल्हा महामंत्री नितीन वासेकर, जिल्हा सचिव प्रसाद ढवस, तालुका अध्यक्ष गणेश झाडे, शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, तालुका महामंत्री सचिन देवाळकर, सचिव रवींद्र टोंगे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

मारेगावात आणखी  23 पॉझिटिव्ह, 232 अॅक्टीव्ह रुग्ण

कोरोना विस्फोट, आज तालुक्यात 168 रुग्ण तर 63 व्यक्तींची कोरोनावर मात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!