नागेश रायपुरे, मारेगाव: आज 8 जून रोजी तालुक्यात केवळ 3 पॉझिटिव्ह आढळले आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या संपूर्ण तालुक्यात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करत कोरोनाचा संसर्ग वाढवू नये असे आर्जवही केले आहे.
आज आरोग्य विभागाने 32 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात सर्व संशयीत निगेटिव्ह आले. तसेच आज 63 व्यक्तीचे आरटीपीसीआर रिपोर्ट यवतमाळहून प्राप्त झाले. त्यात तालुक्यातील कोरोनाचे 3 रुग्ण आढळले आहे. आज आलेल्या रुग्णांवरून 21 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले आहे.
तालुक्यात सध्या केवळ 14 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 12 रुग्ण उपचार घेत आहे तर डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 2 जण उपचार घेत आहे. दरम्यान नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करत कोरोना समुळ नष्ट करावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
हे देखील वाचा: