आज तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण

ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

0

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 10 मार्च रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 2 रुग्ण तर 1 रुग्ण मारेगाव तालुक्यातील आहे. वणी शहरातील रंगारीपुरा व गुरुनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले तर मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळून आला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 31 आहेत.

बुधवारी 13 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यातील 3 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 10 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 90 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आज एका कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 31 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 7 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 20 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 9 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1278 रुग्ण आढळून आलेत. यातील 1222 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

आज जिल्ह्यात 5 मृत्यू
आज जिल्ह्यात कोरोनामुळे 5 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 429 रुग्ण आज आढळून आले आहेत. 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये यवतमाळ शहरातील एक 28 वर्षीय तरुण, 71 वर्षीय व 78 वर्षीय व्यक्ती आहे. तर पुसद येथील 43 व 57 वर्षीय व्यक्ती आहेत.

हे देखील वाचा:

सुभाषचंद्र बोस चौकातील देशी दारुच्या दुकानावर धाड

रेड लाईट एरियातील देहव्यापार अड्ड्यावर धाड

Leave A Reply

Your email address will not be published.