गोंधळावर पडदा: बाजारपेठ संध्याकाळी 5 पर्यंतच सुरू राहणार

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

0

जितेंद्र कोठारी, वणी:आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गांधी चौक येथील 1 रुग्ण आहे तर ग्रामीण भागात भालर, मुर्धोनी व चिखलगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 56 झाले आहेत. दरम्यान आजचा संपूर्ण दिवस हा दुकाने संध्याकाळी 5 पर्यंत की रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार याच गोंधळात गेला. एका मराठी वृत्तपत्रात दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार अशी बातमी आल्याने केवळ व्यापारी वर्गातच नाही तर सर्वसामान्यांमध्येही गोंधळ उडाला. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी आज आदेश काढून बाजारपेठेची वेळ ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच राहणार असे स्पष्ट केले.

बुधवारी दिनांक 17 मार्च रोजी 231 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 227 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 78 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आज यवतमाळ हून एकही रिपोर्ट प्राप्त झाले नाही तर अद्याप यवतमाळहून 504 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 56 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 26 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 17 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 13 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1325 रुग्ण आढळून आलेत. यातील 1243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

बाजारपेठेचा वेळ संध्याकाळी 5 पर्यंतच !
प्रशासनाचे अस्पष्ट आदेश व एका मराठी वृत्तपत्रात प्रकाशित बातमीमुळे आज दिवसभर व्यवसायिकांसह सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती उत्पन्न झाली होती. दि.16 मार्च रोजीचे जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचे आदेशात ‘जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना बाजारपेठेच्या वेळेनुसार सुरू राहील’ असे नमूद करण्यात आले होते. त्यात दि. 17 मार्च रोजी एका मराठी वृत्तपत्रात जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजे पर्यंत सुरू ठेवता येणार अशी बातमी आली. प्रशासनाच्या अस्पष्ट आदेशामुळे अधिकारी ही संभ्रमात होते. अखेर दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले. त्यात दुग्धजन्य पदार्थ व औषधी दुकाने वगळता दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हे देखील वाचा:

शेतमजुराची मुलगी झळकली स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

बळजबरीने देहविक्री करून घेणा-या महिलेला 2 वर्षांची शिक्षा

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.