जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात एकतानगर व रंगारीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर भांदेवाडा येथे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 54 झाले आहेत. दरम्यान आज लॉकडाऊनचा वेळामध्ये शिथिलता आणा अशी मागणी शिवसेनेच्या व्यापारी आघाडीने केली आहे. या बाबत शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शुक्रवारी दिनांक 19 मार्च रोजी 297 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 293 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 107 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज यवतमाळ हून एकही रिपोर्ट प्राप्त झाले नाही तर अद्याप यवतमाळहून 711 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 54 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 22 होम आयसोलेट आहेत. 23 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 9 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1331 रुग्ण आढळून आलेत. यातील 1251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
लॉकडाऊन शिथिल करा शिवसेना व्यापारी आघाडीची मागणी
सध्या शहरात लॉकडाऊनचा वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. ग्राहकांना व्यवसायासाठी वेळ कमी पड़त असल्याने दुकानात एकाच वेळी गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता आणून हा वेळ संध्याकाळी 7 पर्यंत करावा, अशी मागणी शिवसेनेच्या व्यापारी आघाडीतर्फे करण्यात आली. याबाबत आज जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: