जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज शुक्रवारी दिनांक 21 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे अवघे 26 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 20 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात शेलू (खु) येथे सर्वाधिक 9 रुग्ण आढळलेत. आज 67 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आज रुग्णसंख्येचा दर हा कालपेक्षा 0.5 ने कमी झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा दर हा कमी होत असल्याने तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.
वणीत आलेल्या 4 रुग्णांमध्ये जैन ले आऊट, साने गुरुजी नगर, इंदिरा चौक, मोमिनपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात आलेल्या 20 रुग्णांमध्ये शेलू (खु) येथे सर्वाधिक 9 रुग्ण आढळलेत तर चिखलगाव येथे 4, भालर येथे 2 रुग्ण तर उकणी, सोनापूर, गणेशपूर, नवरगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. याशिवाय झरी तालुका व खैरी येथील प्रत्येकी 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आला आहे.
आज यवतमाळ येथून 309 अहवाल प्राप्त झालेत. यात 23 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 134 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 482 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 749 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 484 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 42 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 387 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 55 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5100 रुग्ण आढळून आलेत. यातील 4536 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 80 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
आज रुग्णसंख्येचा दर हा अवघा 5.1 टक्के
काल आरटीपीसीआर व रॅपिड ऍन्टीजन असे 443 संशयीता पैकी 26 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. रुग्णसंख्येचा हा दर 5.1 इतका आहे. काल रुग्णसंख्येचा दर हा 5.6 होता. तर परवा 6.3 टक्के होता. रुग्णसंख्येचा हा दर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. एका आठवड्याआधी हा दर 25 ते 30 टक्यांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा: