जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज तालुक्यात अवघे 11 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 3 रुग्ण तर ग्रामीण भागातील 8 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात सोनापूर येथे सर्वाधिक 3 रुग्ण आढळलेत. तर आज 110 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आज रुग्णसंख्येचा दर हा कालपेक्षा 2.5 टक्यांनी कमी झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा दर हा कमी होत आहे तर कोरोनामुक्तांचा दर वाढत आहे. त्यामुळे तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या तालुक्यात 383 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. एकाच वेळी अधिकाधिक टेस्ट तर दुसरीकडे लॉकडाऊन यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने कमी होण्यास मदत होत आहे.
वणीत आलेल्या 3 रुग्णांमध्ये रंगारी पुरा, प्रगती नगर, टाटा मोटर्स येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात आलेल्या 8 रुग्णांमध्ये सोनापूर येथे सर्वाधिक 3 रुग्ण आढळलेत तर राजूर, घोन्सा, खंडाळा, सावर्ला, पुनवट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळ येथून 327 अहवाल प्राप्त झालेत. यात 10 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 93 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 339 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 751 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 383 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 39 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 296 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 48 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5111 रुग्ण आढळून आलेत. यातील 4646 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 82 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
आज रुग्णसंख्येचा दर हा अवघा 2.6 टक्के
एकूण आरटीपीसीआर व ऍन्टीजनच्या एकूण 420 रिपोर्टपैकी अवघे 11 जण पॉझिटिव्ह आले आहे. रुग्णसंख्येचा हा दर 2.6 टक्के इतका आहे. काल रुग्णसंख्येचा हा दर 5.1 इतका आहे. तर परवा रुग्णसंख्येचा दर हा 5.6 होता. रुग्णसंख्येचा हा दर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. एका आठवड्याआधी हा दर 25 ते 30 टक्यांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे तालुक्याची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा: