जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात 7 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील रविनगर, टिळक नगर व प्रगती नगर येथे प्रत्येकी एक रुग्ण तर ग्रामीण भागात राजूर येथे 2 तर कुरई व झरी तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र अद्याप सुमारे 850 संशयीतांचे रिपोर्ट यवतमाळ हून येणे बाकी असल्याने कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती अद्यापही गेलेली नाही.
बुधवारी दिनांक 24 मार्च रोजी 80 संशयीतांची रॅपिट टेस्ट करण्यात आली. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 73 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 147 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 846 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 7 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.
सध्या तालुक्यात 67 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 27 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 32 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 8 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1383 रुग्ण आढळून आलेत. यातील 1290 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा:
वेश बदलून जुगार अड्ड्यावर धाड, शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई