आज तालुक्यात कोरोनाचे 10 रुग्ण, चिखलगाव येथे 3 पॉजिटिव्ह

ग्रामीण भागात वाढतेय कोरोनाचे रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात 10 रुग्ण आढळून आलेत. यातील केवळ एक रुग्ण वणी शहरातील असून इतर सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील रंगारीपुरा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागात चिखलगाव येथे 3 रुग्ण, कुर्ली, शिंदोला येथे प्रत्येकी 2 तर भालर वसाहत व मारेगाव तालुका येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. दिलासादायक बाब म्हणजे आज तब्बल 27 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. शहरातील रुग्णसंख्या कमी होत असतानाच ग्रामीण भागात मात्र अचानक रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे.

गुरुवारी दिनांक 25 मार्च रोजी यवतमाळहून 171 संशयतींचे अहवाल आले. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 166 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज 78 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 73 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 114 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 789 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 27 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 67 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 27 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 32 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 8 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1383 रुग्ण आढळून आलेत. यातील 1290 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

मुकुटबन येथील धाब्यावर दारूची अवैधरित्या विक्री

ताडोबातील श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी

Leave A Reply

Your email address will not be published.