आज तालुक्यात 7 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्येचा दर आला 1.5 टक्यांवर

ग्रामीण भागातही कोरोना ओसरायला सुरूवात

0

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी तालुक्यात कोरोनाचे अवघे 7 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागातील 7 रुग्ण आहेत. वणी शहरात आलेला रुग्ण हा भगतसिंग चौक परिसरातील आहे. तर ग्रामीण भागात सोमनाळा येथे 4, राजूर व पुनवट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. दरम्यान आज 40 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 207 आहे. सध्या तालुक्यातील रुग्णसंख्येचा दर हा 1.5 टक्यांवर आला आहे.

आज यवतमाळ येथून 392 अहवाल प्राप्त झालेत. यात 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 71 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आला. आज आलेल्या रुग्णावरून 175 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 485 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 207 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 34 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 134 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 39 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5207 रुग्ण आढळून आलेत. यातील 4914 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 86 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

रुग्णसंख्येचा दर आला 1.5 टक्यांवर
आज आरटीपीसीआर व ऍन्टीजनच्या एकूण 463 रिपोर्टपैकी अवघे 7 जण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्येचा हा दर अवघ 1.5 टक्के इतका आहे. कोरोना काळ पिकवर असताना शंभर व्यक्तीमध्ये सुमारे 25 ते 30 व्यक्ती पॉझिटिव्ह येत होत्या. सध्या खेडोपाडी टेस्ट कॅम्प होत असल्याने कोरोनाचे लवकर निदान होत आहे. तसेच लॉकडाऊनचा फायदाही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात मोजके रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे वणी शहर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आता खेड्यातही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे.

हे देखील वाचा:

गाडी जप्त केल्याने त्याचे प्रशासनाच्या वाहनपुढे लोटांगण

हिमांशुजी बतरा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.