जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात तब्बल 168 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात आज रुग्णांनी शतक गाठले. ग्रामीण भागात आज 105 रुग्ण तर वणी शहरात 56 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात टाकळी या एका गावातच 21 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय इतर ठिकाणचे 7 व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आले आहेत. दिलासादायक म्हणजे आज 63 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज तालुक्यातील रुग्णसंख्या जरी अधिक असली तरी रोजपेक्षा आज दुप्पट ते तिप्पट रिपोर्ट यवतमाळहून प्राप्त झाल्याने आजची रुग्णसंख्या वाढली आहे. यवतमाळ येथे उपचारादरम्यान तालुक्यातील 5 व्यक्तींचा मृत्यू झाला. यात वणी येथील 50 वर्षीय पुरुष व 65, 70 वर्षीय महिला, तर ग्रामीण भागातील एक 65 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
आज बुधवारी दिनांक 28 एप्रिल रोजी वणी शहरात आलेल्या 56 रुग्णांमध्ये शास्त्रीनगर, जैन ले आऊट येथे प्रत्येकी 4 तर आंबेडकर चौक, विठ्ठलवाडी, बेलदारपुरा, टागोर चौक येथे प्रत्येकी 3 रुग्ण तर सुभाषचंद्र बोस चौक, वासेकर ले आऊट, रामपुरा, लक्ष्मीनगर, खाती चौक, गाडगेबाबा चौक, सिंधी कॉलनी, पटवारी कॉलनी, साई नगरी येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर सुगम हॉस्पिटल, रामपुरा, जुने कॉटन मार्केट, माळीपुरा, पंचवटी अपार्टमेंट, आदर्श कॉलनी, विद्या नगरी, आर एच कॉर्टर, जटाशंकर चौक, प्रगती नगर, समृद्धी रेसिडेन्सी, दामले फैल, रंगारीपुरा, गेडाम ले आऊट, रंगनाथ नगर, नारायण निवास, विराणी टॉकीज, कनकवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळहून 683 अहवाल यवतमाळहून प्राप्त झाले आहेत. यात 129 पॉझिटिव्ह तर 554 निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय आज 201 व्यक्तींच्या रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 39 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 352 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप यवतमाळहून 1307 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज तालुक्यात 63 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
ग्रामीण भागात आलेल्या 105 रुग्णांमध्ये टाकळी येथे 21 रुग्ण आढळलेत. तर त्या खाली चिखलगाव येथे 13 रुग्ण आढळले. नांदेपेरा, वेकोलि मुंगोली, उमरी येथे प्रत्येकी 7 रुग्ण, सावर्ला येथे 6 रुग्ण, राजूर येथे 4 रुग्ण, कैलास नगर, गणेशपूर येथे प्रत्येकी 3 रुग्ण, रासा, झमकोला, ब्राह्मणी, भांदेवाडा येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर नवेगाव, निळापूर, मोहदा, भालर, बोरगाव, भांदेवाडा, शिरपूर, येनक, हनुमाननगर, वांजरी, कुंभारखनी वसाहत, शेलू, वागदरा, दहेगाव, पुनवट, माथोली, बोर्डा नायगाव, पुरड, सावंगी, पिंपरी, कोलार पिंपरी, भालर टाउनशिप, शिंदोला, मेंढोली, पुरड, परमडोह येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. याशिवाय झरी तालुका 3, मारेगाव तालुका 3 व पाटाळा येथील एक रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.
सध्या तालुक्यात 694 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 35 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 692 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 31 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2994 रुग्ण आढळून आलेत. यातील 2254 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 48 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
चिखलगावचे उपसरपंच अमोल रांगणकर यांचे निधन
चिखलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल जयवंत रांगणकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. दरम्यान दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता पोहोचताच परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई वडील असा आप्त परिवार आहे. त्यांनी काँग्रेस, शिवसेना या पक्षामध्ये ही काम केले आहे. पक्षा पलीकडे एक धडाडीचे व सर्वसामान्याच्या एका हाकेला जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
हे देखील वाचा:
पतसंस्थेची 97 लाखांने फसवणूक, वणीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल