जब्बार चीनी, वणी: कित्येक दिवसानंतर आज तालुक्यासाठी ख-या अर्थाने खुशखबर मिळाली आहे. आज तालुक्यात एकही कोरोनाचे रुग्ण आढळून आला नाही. आज जरी यवतमाळून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नसला तरी आज 152 संशयीतांची रॅपि़ड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात एकही संशयीत पॉझिटिव्ह आला नाही. याशिवाय अवघ्या दोन आठवड्यात 500 पेक्षा अधिक असलेली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघी 53 वर आली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाची लाट जवळपास ओसरली असे म्हणता येऊ शकते. गेले कित्येक दिवस सततच्या रुग्णाने सर्वसामान्यांचे जीवण व्यथीत झाले होते. मात्र आज एकही रुग्ण न मिळाल्याने तालुकावासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
आज गुरुवारी दिनांक 3 जून रोजी 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज 58 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 97 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 53 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 10 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 29 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 14 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5236 रुग्ण आढळून आलेत. यातील 5090 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा:
[…] […]