मुलीला आंघोळ करताना न्याहाळणा-या विकृताच्या आवळल्या मुसक्या

वणीतील खरबडा परिसरातील घटना, आरोपीवर विनयभंगासह पोस्को दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: न्हाणीघरात आंघोळ करणा-या अल्पवयीन मुलीला पाहून विनयभंग कऱणा-या एका विकृताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. सदर घटना वणीतील खरबडा परिसरातील आहे. बुधवारी या प्रकऱणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की शहरातील खरबडा परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन पीडिता राहते. तिच्या घरा जवळच आरोपी सिद्धार्थ जनार्धन गायकवाड (36) हा राहतो. सिद्धार्थ हा मुलगी न्हाणीघरात आंघोळीला गेली की तिला लपूनछपून बघायचा. काही दिवसांनी पीडितेच्या लक्षात ही बाब आली.

मंगळवारी दिनांक 1 जून रोजी दुपारी पीडिता ही आंघोळीसाठी गेली असता आरोपी तिथे आला व पीडितेला न्हानीघरातून न्याहाळत होता. दरम्यान ही बाब पीडितेच्या कुटुंबीयांनाही कळली. मात्र दुस-या दिवशी पुन्हा असाच प्रकार घडला. बुधवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास पीडिता आंघोळीला गेली असता तिथे आरोपी आला व न्हानीघरात डोकावून पाहत होता.

त्यानंतर मात्र पीडितेच्या कुटु्ंबीयांच्या संतापाला पारावार उरला नाही. त्यांनी त्वरीत पोलीस स्टेशन गाठले व आरोपी सिद्धार्थ जनार्धन गायकवाड (36) विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्वरित याची दखल घेत आरोपीवर भादंविच्या कलम 354, 323, 504 व पोस्कोच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला व आरोपीच्या मुसक्या आवळल्या. प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे.

हे देखील वाचा:

खुशखबर: 152 संशयीतांपैकी सर्व निगेटिव्ह, दुसरी लाट ओसरतेय

Leave A Reply

Your email address will not be published.