सलग दुस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

आज आढळलेत 76 पॉझिटिव्ह तर 105 रुग्ण कोरोनामुक्त

0

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 30 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आली. आज तालुक्यात 76 रुग्ण आढळलेत तर 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 25 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 38 पॉझिटिव्ह आढळून आलेत. 13 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. विशेष म्हणजे आजदेखील आरोग्य विभागाने तब्बल 499 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहे. अधिकाधिक व्यक्तींच्या टेस्ट होणे ही एक दिलासादायक बाब आहे. दरम्यान आज तालुक्यातील 6 रुग्णांचा यवतमाळ येथे मृत्यू झाला. यात शासकीय रुग्णालयात एका 69 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिलेचा तर खासगी रुग्णालयात एका 51 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे 45, 60, 63 वर्षीय पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वणी शहरात आलेल्या 25 रुग्णांमध्ये आज जैन ले आऊट येथे 5 रुग्ण, जैताईनगर 3, माळीपुरा 3, लक्ष्मीनगर 2, शास्त्रीनगर 2, रवीनगर 2, विठ्ठलवाडी 2, तसेच गेडाम लेआऊट, इंदिरा चौक, गुरुनगर, रंगनाथनगर, रामपुरा, भगतसिंग चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

ग्रामीण भागात आलेल्या 38 रुग्णांपैकी शिवणी, कैलासनगर, मुंगोली, लालगुडा, उकणी येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळलेत. कायर येथे 2, पुनवट 2, बेलोरा 2, शिरपूर 2, वेळाबाई 2, तर शेवाळा, कोलगाव, घोन्सा, चिखलगाव, वांजरी, ब्राह्मणी, मानकी, रासा, खांदला, केसुर्ली, सावर्ला, राजूर, छोरिया ले आऊट गणेशपूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहेत. तर वरोरा येथील 3, घुग्गुस येथील 7, मारेगाव तालुका 2, वडकी 1 असे एकूण 13 रुग्ण आढळलेत.

आज यवतमाळ येथून 377 अहवाल प्राप्त झालेत. यात 60 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 50 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 16 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 499 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले नाही. अद्याप यवतमाळहून 1685 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 561 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 43 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 487 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 31 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 3110 रुग्ण आढळून आलेत. यातील 2496 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी 2 आरोपींना अटक

Leave A Reply

Your email address will not be published.