सलग दुस-या दिवशी तालुक्यातील रुग्णसंख्या शुन्य

आता तालुक्यात कोरोनाचे केवळ 43 ऍक्टिव्ह रुग्ण

1

जब्बार चीनी, वणी: सलग दुसरा दिवस तालुक्यासाठी दिलासादायक ठरलेला आहे. आज ही तालुक्यातील रुग्णसंख्या शुन्य आहे. आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. आज जरी यवतमाळून एकही रिपोर्ट प्राप्त झाला नसला तरी आज 74 संशयीतांची रॅपि़ड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात एकही संशयीत पॉझिटिव्ह आला नाही. तालुक्याची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 43 झाली आहे.

आज शुक्रवारी दिनांक 4 जून रोजी 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज 32 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 129 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 43 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 8 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 27 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 8 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5236 रुग्ण आढळून आलेत. यातील 5100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

सासुरवाडीला निघालेल्या तरुणावर काळाचा घात

 

Leave A Reply

Your email address will not be published.